ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकारी ”ऑनफिल्ड”

माझें कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेतर्गत उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) चंद्रकांत पवार यांनी केला भिवंडी दौरा

ठाणे : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि  अधिकारी – कर्मचारी एकदिलाने काम करत आहेत. ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे प्रमुख अधिकारी ग्रामीण भागात क्षेत्रीय भेटी देऊन ‘ऑनफिल्ड’ ( प्रत्येक्ष ठिकाणी जाऊन ) अभियानाची पाहणी करत आहेत. आज  उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत) चंद्रकांत पवार यांनी भिवंडी गटातील प्राथमिक आरोग्य केंद्र दिवे अंजुर तसेच ग्रामपंचायत अंजुर, आलिमघर, मानकोली, दापोडे येथे आरोग्य सर्वेक्षण पथके सर्व्हेक्षण करत असलेल्या  ठिकाणी पाहणी केली.
यावेळी  भिवंडी पंचायत समितीचे सन्माननीय सभापती विकास भोईर, उपसभापती जितेंद्र डाकी,  गट विकास अधिकारी डॉ.प्रदिप घोरपडे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग चौरे, विस्तार अधिकारी राजू भोसले , ग्रामविकास अधिकारी निलेश पाटील, मंगलसिह परमार, विशाल शेलार उपस्थित होते.
ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे  जिल्ह्याच्या ग्रामीण भागात  माझे कुटुंब माझी जबाबदारी
अभियानाला अधिक गतिमानता येण्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी जिल्हास्तरीय विभागप्रमुखांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. हे संपर्क अधिकारी तालुक्यांचा दौरा करत अभियानाची गति वाढविण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण पथकात कार्यरत असणाऱ्या  कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत त्यांचे प्रोत्साहन वाढवत आहेत.

 431 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.